Budget 2023 : शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये

Budget 2023 : शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ३०० कोटी रुपये

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात देवेंद्र फडणवीस प्रथमच बजेट मांडणार मांडणार आहे. इतकेच नव्हेतर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचला जात आहे. आज तुकाराम बीज असल्याने भागवत धर्मातील तुकाराम महाराजांच्या चरणी दंडवत घालून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात फडणवीसांनी केली आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषकांचे हे 350 वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्याची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्राचे पुढील वाटचाल असेल. 2 ते 9 जून या कालावधीत शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार असून यासाठी 250 कोटी निधी उपलब्ध करण्यात येईल. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर या ठिकाणी उद्यानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रदर्शित करण्यात येईल. यासाठी 250 कोटींचा निधी देईल. शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com