MPSC Result
MPSC ResultTeam Lokshahi

MPSC: PSI परीक्षेचा निकाल जाहीर

नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) 09 आणि 17 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2021 संयुक्त पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक या संवर्गामधून शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेत अहर्ताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, मुख्य परीक्षेच्या निकालाच्याआधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्ग पदांची संख्या 376 असून शारीरीकचाचणीसाठी अर्हता प्राप्त ठरलेले उमेदवार संख्या 1535 आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com