Pune
PuneTeam Lokshahi

धक्कादायक! पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली
Published by :
Sagar Pradhan
Published on

अमोल धर्माधिकारी।पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो पुण्यात 'एमपीएससी'च्या परीक्षेची तयारी करत होता.

Pune
तुम्ही केलेल्या अभद्र युतीच्या विरोधात आमचा उठाव, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. त्रिभुवन कावले (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा जालन्याचा रहिवासी आहे. त्रिभुवन हा मागील जानेवारी २०२१ पासून तयारीसाठी पुण्यात मित्रांसोबत राहत होता.

आज दुपारच्या सुमारास त्याच्या राहत्या खोलीत तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून नैराश्यातून त्याने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com