crime
crimeTeam Lokshahi

धक्कादायक! प्रेम प्रकरणातून डोक्यात दगड घालून मित्राचा खून

आरोपी 12 तासांच्या आता जेरबंद

रिध्देश हातीम | मुंबई : कोणीतरी खरंच म्हटलं आहे की प्रेमात व्यक्ती काही करू शकतो. मात्र, प्रेमापोटी आपल्या मित्राचा खून करणे ही एक धक्कादायक गोष्ट आहे आणि असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बोरिवली जीआरपीला 15 मे रोजी रात्री 10.30 वाजता जोगेश्वरी राम मंदिरादरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ एका 26 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळाली. बोरिवली लोहमार्ग पोलिसांना मृतक व्यक्ती संदेश महादेव पाटील (वय २६) असे त्याचे नाव असल्याचे समजले. संदेश हा नेरुळ नवी मुंबईचा रहिवासी आहे आणि जोगेश्वरीच्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड सेल सेक्टरमध्ये गेल्या एक वर्षापासून काम करत होता.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळवली व सीसीटीव्हीच्या मदतीने तपास केला असता मृताचा मित्र २३ वर्षीय छुटकन रामपाल सफी यानेच त्याचा खून केल्याचे समोर आले.

काही महिन्यांपूर्वी बॅंकेत काम करणार्‍या महिलेने छुटकन रामपाल सफी याला सोडून मृत संदेश पाटीलशी मैत्री केली. या सर्वाचा डोक्यात राग ठेवून त्याने संदेशला जोगेश्वरी राम मंदिर स्टेशनमध्ये बोलावलं आणि तिथे संधी साधून संदेश याच्या डोक्यात दगडाने घालून निर्घृण हत्या केली. दरम्यान, बोरिवली जीआरपीने 12 तासात जोगेश्वरी येथून आरोपी रामपाल सफी विरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com