आधी डोक्यावर घेतली बाप्पाची मूर्ती अन् मग...; नवनीत राणांच्या गणेश विसर्जनाची चर्चा

आधी डोक्यावर घेतली बाप्पाची मूर्ती अन् मग...; नवनीत राणांच्या गणेश विसर्जनाची चर्चा

विरोधकांसह सोशल मीडियावरुन राणा दाम्पत्यावर जोरदार टीका

मुंबई : दहा दिवसांच्या मनोभावे पूजा केल्यानंतर भक्तांनी शुक्रवारी जड अंतकारणाने विधीवत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तर, नेतेमंडळींनीही मोठ्या थाटात गणेश विसर्जन केले. परंतु, चर्चा होतीये ती खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या गणपती विसर्जनाची.

आधी डोक्यावर घेतली बाप्पाची मूर्ती अन् मग...; नवनीत राणांच्या गणेश विसर्जनाची चर्चा
माफी माग नाही तर तुला सोडणार नाही; पोलीस पत्नीचा नवनीत राणांना इशारा

राज्यात सर्वत्र अनंत चतुर्दशीचा उत्साह असताना नवनीत राणा यांनीही बाप्पाचे विसर्जन केले. परंतु, साधारणतः गणपती विसर्जन करताना मुर्ती पाण्यात दोन ते तीन वेळा पाण्यात वरखाली केली जाते. मात्र, नवनीत राणा यांनी आधी बाप्पाची मूर्ती डोक्यावर घेतली व नंतर ही गणेश मुर्ती काही उंचीवरुन खाली फेकली. यादरम्यानचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी नवनीत राणांवर टीकेची झोड उठवली आहे. तर, विरोधकांनीही राणा दाम्पत्यावर टीकास्त्र डागले आहे. हेच का तुमचे हिंदुत्व, असा सवालही शिवसेनेच्या प्रवक्त्या सुष्मा अंधारे यांनी केला आहे. यामुळे राणा दाम्पत्य आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून नवनीत राणा यांच्या अडचणीत भर पडत आहे. हनुमान चालिसा वाचण्यावरुन आक्रमक झालेल्या नवनीत राणा यांना एका मुलाखतीत हनुमानाचा अर्थ विचारला असता त्यांना सांगता आला नव्हता. यावरुनही त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. तर, नुकतेच अमरावतीतून एक मुलगी बेपत्ता झाल्याने याचा संबंध लव्ह जिहादशी खासदार नवनीत राणा यांनी जोडला होता. परंतु, मुलीने माध्यमांसमोर येत नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे, असा खुलासा केला होता.

Lokshahi
www.lokshahi.com