Nawab Malik
Nawab MalikTeam Lokshahi

न्यायालयाचा नवाब मालिकांना धक्का, जामीन अर्ज फेटाळला

प्रकृतीच्या कारणामुळे मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published by :
Sagar Pradhan

राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आली होती. मलिक हे मागील अनेक महिन्यांपासून अटकेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जामीन अर्जावर आज मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने मलिक यांना धक्का देत जामीन फेटाळला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मलिक यांच्या जामीन न्यायमूर्ती रोकडे यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली.

Nawab Malik
शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर मंत्री लोढांचे स्पष्टीकरण, केवळ त्या...

काय आहेत नवाब मलिक यांच्यावर आरोप?

मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर 23 फेब्रुवारीला सकाळी ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी दाखल झाले. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक अटक करण्यात आलं. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून केले जातात. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या.

यातीलच एक प्रकरण मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. मंत्री नवाब मलिक यांनी जी जमीन घेतली आहे. ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि सरदार पटेल जो हसीना पारकरचा राईट हँड आहे. आणि ज्याला हसीना पारकर दाऊदच्या प्रॉपर्टी बिझमेसमध्ये फ्रंट मॅन वापरत होती. त्यांच्याकडून ही जमीन त्यांनी घेतली, असा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com