मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याच्या फोटोला नवरदेव बनवत वाजत गाजत काढली वरात; राष्ट्रवादीच अनोखं आंदोलन

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याच्या फोटोला नवरदेव बनवत वाजत गाजत काढली वरात; राष्ट्रवादीच अनोखं आंदोलन

आर्वी नगरपरिषेदेत घनकचऱ्यात कोटींचा भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रवादीच अनोखं आंदोलन

भूपेश बारंगे | वर्धा : वर्ध्यातील आर्वी नगर परिषेदेत आरोग्य विभागात घनकचरा संकलन, वाहतूक, वर्गीकरण, प्रक्रिया कंत्राट, मनुष्यबळ पुरवठ्यात कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरात अनोखं आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याच्या फोटोला नवरदेव बनवत वाजत गाजत काढली वरात; राष्ट्रवादीच अनोखं आंदोलन
वर्ध्यात गणिताच्या पेपरला विद्यार्थ्यांजवळ आढळला मोबाईल

आर्वी शहराची कोटींची लूट केली जात आहे. मनुष्यबळ कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करत आहे. कामगारांना अधिकारी मजुरी देत नाही. अंदाजपत्रक नमूद केलेल काम केले जात नाही. त्यामुळे कामाला हरताळ फासला जात आहे. याविरोधात आज आर्वी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच अनोखं आंदोलन करण्यात आला. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक बॅनरवरील चेहऱ्यावर नवरदेवाच मुकुट लाऊन सर्व विधी करत शहरात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत वरात काढण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महिला कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कायद्याचे फटके द्या म्हणत स्वतःला मारले फटके!

दिलीप पोटफोडे यांनी नगर परिषदेत झालेल्या भ्रष्टाचार विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आले. यावेळी दोषींना चाबूक द्या असं म्हणत स्वतःला फटके मारत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांनी निवदेन देण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com