वाशिममध्ये नवे उपविभागीय पोलीस अधिकारी ठरतायंत गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ
गोपाळ व्यास | वाशिम : जिल्ह्यात फोफावत चाललेले अवैध धंदे अन् त्याला मिळणारा राजाश्रय जिल्ह्यात चिंतेची बाब होत चालली होती याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसला. मात्र, काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यात प्रोफेशनल ट्रेनिंग बेसवर 'सिंघम' म्हणून परिचित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते येताच गुन्हेगारांवर अंकुश निर्माण केला आहे. त्यांनी आपला दरारा कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
अमर मोहिते यांनी वाशिम, रिसोड मालेगावमध्ये अवैधरित्या साठवणूक करून गुटखा विक्री करणाऱ्यांवर छापे टाकून 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. व आरोपींना अटक करून कारवाई केली. त्यामुळे गुटखा माफियांचे चांगलेच धाबे दणाणले.
कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे. आणि हीच जबाबदारी पार पाडत वाशिम जिल्ह्यातील अवैध धंदे, रोडरोमिओ, टपोरी अशांना चांगलाच धडा शिकविला आहे. महाराष्ट्र पोलिस दलात 'सिंघम' म्हणून नावारुपाला येत असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी परिविक्षाधीन म्हणून पहिलाच जिल्हा वाशिम मिळाल्यामुळे आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडत कारवायांचा सपाटा लावल्याने गुन्हेगारांची पळताभुई होत आहे.