Nitin Gadkari
Nitin GadkariTeam Lokshahi

शिवाजी महाराज आमचं दैवत : नितीन गडकरी

शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक गांधीगेट येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

नागपूर : शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक गांधीगेट येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हजेरी लावली होती. यावेळी बोलताना गडकरींनी शिवाजी महाराज आमचं दैवत असल्याचे म्हंटले आहे.

Nitin Gadkari
धनुष्यबाणाचा वाद : शरद पवारांनी स्पष्टच सांगितले...

नितीन गडकरी म्हणाले की, शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. आपल्या जीवनात आई-वडील एवढी किंमत शिवाजी महाराज यांची आहे. दिल्लीत माझ्या ऑफिसमध्ये खुर्चीसमोर त्यांची प्रतिमा आहे. शिवाजी महाराजांचे छोटे छोटे गुण घेणे महत्वाचे आहे.

नागपूरचं शिवतीर्थ म्हणजेच महाल परिसर म्हणजे एक इतिहास आहे. मी सहा महिन्यात परत महाल परिसरात रहायला येणार इथे वेगळा आनंद आहे, अशाही भावना गडकरींनी व्यक्त केल्या.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकशाहीच्या नागपूरच्या पत्रकार कल्पना नळसकर यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com