लोकशाही बातमीचा दणका! बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश

लोकशाही बातमीचा दणका! बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश

काही पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात टाळाटाळ केली जात होती

गोपाल व्यास | वाशिम : जिल्हा पोलीस विभागात प्रशासकीय स्तरावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या 18 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आल्या होत्या. अनेक पोलीस ठाण्यांत बदली झालेल्या काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. तर, काही पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची गुप्त माहिती व बदलीचे पत्र पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकशाही मराठी न्युजला दिले. बदली संदर्भात लोकशाही मराठीला बातमी लागताच वाशिम पोलीस दलात खळबळ माजली होती. त्यानंतर लगेच बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश काढण्यात आला.

लोकशाही बातमीचा दणका! बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचा आदेश
मोठी बातमी : परमबीर सिंग यांचे निलंबन रद्द; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

वाशिम जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन तब्बल 7 महिने उलटले. मात्र, कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी ठोस भूमिका घेतली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, आज लोकशाही मराठीने पोलिस कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेत वाचा फोडण्याचं काम केलं. कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देताच कर्मचाऱ्यांमध्ये आनंदच वातावरण पाहायला मिळाले. एकीकडे पोलीस दलात बदली दरम्यान देवाण-घेवाण करीत अनेक पोलीस कर्मचारी बदल्या होतानाची चर्चा असते? मात्र प्रशासकीय बदल्या होऊन सुद्धा कर्मचाऱ्यांना बदली ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांनी लोकशाही मराठी न्युजकडे आपली मागणी मांडली. कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्याचे आदेश दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com