मोठी बातमी : परमबीर सिंग यांचे निलंबन रद्द;
शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

मोठी बातमी : परमबीर सिंग यांचे निलंबन रद्द; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

परमबीर सिंगांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी लाच घेतल्याचा आरोप केला होता.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. परमबीर सिंगांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी लाच घेतल्याचा आरोप केला होता.

मोठी बातमी : परमबीर सिंग यांचे निलंबन रद्द;
शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
रेशीमबागेतून नैतिकतेची नवी व्याख्या तयार झालीयं का? अंधारेंचा फडणवीसांना खोचक प्रश्न

परमबीर सिंग यांनी 2022 मध्ये निलंबनाला आव्हान दिले होते. यावर आज शिंदे-फडणवीस सरकारने परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप महाराष्ट्र सरकारने मागे घेतले आहेत. एवढेच नाही तर डिसेंबर २०२१ मध्ये दिलेला निलंबन आदेशही सरकारने रद्द केला आहे. तसेच, निलंबनाच्या काळात ते ऑन ड्युटी होते, असे समजावे, असेही म्हटले आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांच्यावर खंडणी,अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते. प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती. यासंबंधी आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी अहवाल सादर केला होता. हा अहवाल स्वीकारत तत्कालीन ठाकरे सरकारने परमबीर सिंह यांचे निलंबन केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com