Video : अतिक्रमण उपायुक्तांची मुजोरी; थेट लाथेने उडवले सगळे स्टॉल, सुप्रिया सुळे संतप्त

या प्रकाराचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांनी थेट सगळे स्टॉल लाथेने उडवून लावले आहेत. या प्रकाराचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला असून उपायुक्तांवर कारवाई करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे.

फर्ग्युसन रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करायला गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्त गुंडासारखे वागले होते. अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी सगळे स्टॅाल लाथेने उडवून लावले. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्तांकडेही तक्रार करण्यात आली आहे. तर, सुप्रिया सुळेंनीही ट्विटरद्वारे माधव जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com