आंबेगाव तालुक्यात अफूच्या शेतीवर पोलिसांची कारवाई; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आंबेगाव तालुक्यात अफूच्या शेतीवर पोलिसांची कारवाई; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आंबेगाव तालुक्यामधील गंगापूर गावामध्ये अफुची शेती करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कार्यवाही करण्यात आलेली आहे.

चंद्रशेखर भांगे | पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील गंगापूर गावामध्ये अफुची शेती करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कार्यवाही करण्यात आलेली आहे. यात दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कार्यवाही करण्यात आले असून आठ दिवसांमध्ये ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात अफूच्या शेतीचे प्रमाण किती आहे? हे आता पोलिसांना शोधावं लागणार आहे. कारण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पुणे जिल्ह्यात अफूची शेती होताना दिसत आहे.

 आंबेगाव तालुक्यात अफूच्या शेतीवर पोलिसांची कारवाई; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
शिंदे व त्यांच्या लोकांनी फडणवीसांबरोबर ‘लव्ह जिहाद’ केला; राऊतांचे टीकास्त्र

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मोजे गंगापूर येथे आरोपी श्रीसंत यांच्या शेतामध्ये एक लाख 87 हजार पाचशे रुपये किमतीचे अफूचे झाड शेतामध्ये आढळून आले. अफुची शेती करण्यासाठी लागणारे, सर्व साहित्य, बी-बियाणे सुद्धा पोलिसांना यावेळी तपासात सापडले. तब्बल दोन लाख रुपयाचा आफूच्या शेतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. यासंदर्भामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल महादेव चव्हाण (वय 35) घोडेगाव पोलीस स्टेशन याने आरोपी विरोधामध्ये गुन्हा दाखल केला.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या अफूच्या शेतीचे पीक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर आता पोलिसांकडून कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुणे जिल्ह्यातीलच आंबेगाव तालुक्यातली ही दुसरी कारवाई आहे. घोडेगाव पोलीस स्टेशन च्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने ही कार्यवाही करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com