गावठी कट्टा बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

गावठी कट्टा बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

आपली फक्त दहशत पसरवण्यासाठी काही लोक गुन्हा करतात. असाच एक प्रकार मालवणीतून समोर आला आहे.

रिध्देश हातीम | मुंबई : आपली फक्त दहशत पसरवण्यासाठी काही लोक गुन्हा करतात. असाच एक प्रकार मालवणीतून समोर आला आहे. लोकांमध्ये आपली दहशत पसरवून लोकांसमोर डॉन बनण्याकरता एका तरुणाने गावठी कट्टा बाळगला होता.

गावठी कट्टा बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
काँग्रेसकडून सावरकरांचा पुन्हा अपमान! वडेट्टीवारांच्या कन्येच्या वक्तव्याने वाद; बलात्काराला राजकीय हत्यार...

मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तरुण आपली दहशत माजविण्याच्या उददेशाने गावठी कट्टा बाळगत आहे, अशी माहिती गुप्त खबरीद्वारे सपोनि निलेश साळुंके यांना मिळाली होती. माहिती मिळाताच वपोनि शेखर भालेराव यांना अवगत करून त्याचे आदेश व मार्गदर्शन्वयेवर मालवणी परिसरात गेले असता एक तरुण दिसून आला.

त्या तरुणाला पोलिसांची कुणकुण लागताच त्याने अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा पाठलाग करुन चॅपल मैदानाजवळ पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले व त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता गावठी कट्टा मिळून आला.

दरम्यान, आरोपीला कट्टयाबाबत विचारले असता तो गावठी कट्टा त्याचा साथीदार अक्षय पाठक याने दिल्याचे सांगितले. अटक आरोपीचे नाव संदेश कृष्णा पाटील (वय 32) असून आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. दरम्यान, पोलिसांचा पुढील तपास सुरू असून त्याचा साथीदार अक्षय पाठक याचा शोध घेत आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com