...अन्यथा अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त जबाबदार; धार्मिक स्थळांना पोलिसांची नोटिस

...अन्यथा अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त जबाबदार; धार्मिक स्थळांना पोलिसांची नोटिस

राज्यात सध्या देवस्थानावरुन वातावरण तापले आहे. अशात, सांगली पोलिसांनी धार्मिक स्थळांना नोटीस जारी केली आहे.

संजय देसाई | सांगली : राज्यात सध्या देवस्थानावरुन वातावरण तापले आहे. अशात, सांगली पोलिसांनी धार्मिक स्थळांना नोटीस जारी केली आहे. यामध्ये सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि प्रार्थना स्थळे बंदिस्त ठेवण्यासाठी वॉल कंपाऊंड करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. काही अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त जबाबदार असतील, असेही नोटीसीत स्पष्ट केले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी माहिती दिली आहे.

...अन्यथा अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त जबाबदार; धार्मिक स्थळांना पोलिसांची नोटिस
शकुनीमामाचा बीड मध्ये FLOP शो; महाप्रबोधन यात्रेची राणे-सामंतांनी उडवली खिल्ली

काही दिवसांपूर्वी मंदिरामध्ये मनोरुग्णाने तोडफोड केल्याने मिरज शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत अशा अप्रिय घटना घडू नये यासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, बौद्ध विहार तसेच चर्च या धार्मिक स्थळांवर करडी नजर ठेवण्यासाठी विश्वस्तांना नोटिसा बजावल्या आहेत. सदर धार्मिक स्थळाला वॉल कंपाऊंडस सीसीटीव्ही कॅमेरेस सुरक्षा रक्षक, नेमणूक करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. या सुरक्षा व्यवस्था न केल्यास कोणतीही अप्रिय घटना घडल्यास विश्वस्त मंडळ त्याला जबाबदार राहील, असा इशारा पोलीस निरिक्षक संजीव झाडे यांनी दिला आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये एका समुदायाच्या गटाने कथितरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून आमची धूप दाखवण्याची परंपरा असल्याचा दावा त्या समुदायाने केला होता. परंतु, अशी कोणतीही परंपरा नसल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तापले असून सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी गठीत केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com