Shinde-Fadnavis Goverment will Audit the Shiv Bhojan Thali
Shinde-Fadnavis Goverment will Audit the Shiv Bhojan ThaliTeam Lokshahi

ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी शिवभोजन थाळीचं ऑडिट होणार!

प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून माहिती घेणार; सोशल ऑडिटसाठी यशदा, टीस संस्थांना पाचारण
Published by :
Vikrant Shinde

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी ही गोरगरिबांसाठी स्वस्त, दर्जेदार व पौष्टिक भोजन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. शिवभोजन थाळी ही योजना ठाकरे सरकारच्या अतिशय महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक आहे. दरम्यान, 4 महिन्यांपुर्वी राज्यात राजकीय भुकंप झाल्यानंतर सत्तांतर झालं आणि नव्यानं सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने आता शिवभोजन थाळीचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

कसं असणार ऑडिटचं स्वरूप?

  • सोशल ऑडिट करण्यासाठी यशदा आणि टिस या संस्थांना पाचारण

  • प्रत्येक जिल्ह्यातील शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांकडून घेणार माहिती

  • या योजनेचा किती लाभ झाला? यामध्ये काही सुधारणा करणे अपेक्षित आहे का? योजनेत पारदर्शकता आहे का? यासारखी माहिती गोळा करणार

  • ज्या सेंटर संदर्भात तक्रारी आहेत ते सेंटर चालू ठेवायचं की बंद करायचं यावरती निर्णय होणार

  • संपूर्ण राज्यातून ही माहिती गोळा झाल्यानंतर शिव भोजन थाळी योजनेत बदल करणार

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com