बापरे! विषारी नागाने फणा काढला, मुलाला चावा घेणार तेवढ्यात...

बापरे! विषारी नागाने फणा काढला, मुलाला चावा घेणार तेवढ्यात...

थरारक घटनेचा व्हिडीओ चंद्रपूरात व्हायरल झाला आहे
Published on

अनिल ठाकरे | चंद्रपूर : आई ही आईच असते, असे आपण नेहमीच म्हणतो. याचीच प्रचिती चंद्रपूरमध्ये आली आहे. विषारी नागावर मुलाचा पाय पडला. नागाने फणा काढला व मुलाला चावा घेणार तितक्याच आईनं विद्युत गतीने मुलाला ओढलं. नागाचा निशाणा चूकला.आईचा समयसूचकतेमुळे मुलगा वाचला. या थरारक घटनेचा व्हिडीओ चंद्रपूरात व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक महिला आपल्या चिमुकल्याला घेऊन घराबाहेर निघत आहे. आईचा चिमुकला घराची पायरी उतरतो. मात्र, पायरीलाच अगदी चिटकून विषारी नाग असतो. नकळत नागावर मुलाचा पाय पडतो. पाय पडताच नाग साप चवताळतो. मुलाला चावा घेण्यासाठी साप फणा काढतो. आणि आता चावा घेणार नेमकं त्याचवेळी आई मुलाला स्वतःकडे ओढते. काळजाचा ठोका चुकविणारा हा व्हिडीओ आताव व्हायरल झाला आहे.

वन, वन्यजीवांचा संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या ग्रुपवर हा व्हिडीओ टाकला आहे. हा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, या व्हिडीओतील घटनास्थळ नेमके कुठले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com