बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा नऊ वर्षानंतर लागला निकाल; आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा

बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा नऊ वर्षानंतर लागला निकाल; आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा

सात जणांनी केली होती चिमुकल्यासह तिघांची हत्या

उदय चक्रधर | भंडारा : जिल्ह्यातील तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाप्रकरणाचा आज निकाल लागला आहे. या हत्याकांडाप्रकरणी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश अस्मार यांनी सात आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर सोबतच दहा हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. तब्बल नऊ वर्षानंतर या सोनी हत्याकांडाचा निकाल लागलेला असून दरोडा टाकायला आलेल्या सात आरोपींनी एका चिमुकल्यासह तिंघाची निर्घृण हत्या केली होती.

बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा नऊ वर्षानंतर लागला निकाल; आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा
महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याशिवाय राहणार नाही : बावनकुळे

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील प्रतिष्ठित सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा ध्रुविल या तिघांचा 26 फेब्रुवारी 2014 च्या मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातून 8.3 किलो सोने, 345 ग्रॅम चांदी आणि 39 लाख रुपये रोख असे साडेतीन कोटींचा ऐवज पळविला होता. त्यानंतर हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सातही आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली होती.

यातील चार आरोपींना तुमसरातून, दोन आरोपींना नागपुरातून आणि एक आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली होती. हत्याकांडात बचावलेली संजय सोनी यांची मुलगी हीरल ही न्यायालयात अ‍ॅड.निकम यांची भेट घेऊन आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तुमसर पोलिसांनी या प्रकरणात 800 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. पोलिसांना याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले होते.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला. या हत्याकांडाप्रकरणी सात आरोपींवर काल आरोप सिद्ध झाल्यानंतर सातही आरोपींना आज आजीवन कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. आरोपींमध्ये शाहनवाज ऊर्फ बाबू शेख, महेश आगाशे, सलीम पठाण, राहुल पडोळे, केसरी ढोले रा.तुमसर, सोहेल शेख, रफीक शेख (रा.नागपूर) यांचा समावेश आहे. आरोपींच्या वतीने वकील धनंजय बोरकर यांनी बाजू मांडली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com