छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू

गॅस सिलेंडर ट्रक आणि सिल्लोड-पाचोरा एसटी बसमध्ये भीषण टक्कर

सचिन बडे | छत्रपती संभाजीनगर : येथील वांगी जवळ एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर ट्रक आणि सिल्लोड-पाचोरा एसटी बसमध्ये भीषण टक्कर झाली आहे. यामध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. यादरम्यान महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com