एसटी कर्मचारी संपाबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

एसटी कर्मचारी संपाबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

Published by :

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा लढा हा राज्यभर अद्यापही कायम आहे. कर्मचाऱ्यांनी आता बसस्थानकावर स्वतःचा मुक्काम ठोकला आहे आणि स्वतःचा संसार देखील बसस्थानकावर मांडला आहे. संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता बसस्थानकावर स्वयंपाक बनवून करून खाऊ परंतु विलनीकरण घेऊनच राहू असा याठिकाणी सरकारला इशारा दिलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत (ST Workers Strike) न्यायालयानेही 22 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State government) आज मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली आहे.

आजपर्यंतच्या बैठका निष्फळ -ऐन दिवाळीत सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. भाजपसह इतर राजकीय संघटनांनी संपाला पाठिंबा दिल्याने धार तीव्र झाली आहे. एसटी महामंडळाने (ST) न्यायालयात संपाविरोधात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने सुद्धा संप बेकायदा ठरवला आहे. राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आव्हान केले. मात्र कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये, अशी कृती समितीची मागणी आहे.

संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार, एसटी महामंडळ, परिवहन मंत्री, कृती समिती आणि संपकरी शिष्टमंडळ यांच्यात सातत्याने बैठक होत आहेत. मात्र ठोस निर्णय होत नसल्यामुळे आत्तापर्यंतच्या बैठका निष्फळ ठरल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com