ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

एमबीबीएसच्या प्रथमवर्गात घेत होती शिक्षण

अमोल धर्माधिकारी | पुणे : ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थिनीनी आत्महत्या केली आहे. एमबीबीएसच्या प्रथमवर्गात ती शिक्षण घेत होती. नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आदिती दलभंजन (वय 20, रा. सिंहगड रोड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा! फडणवीसांचे शांततेचे आवाहन; म्हणाले, राजकीय नेत्यांनी...

आदिती ही आपल्या आई-वडिलांबरोबर आनंदनगर येथे राहण्यास असून ती अभ्यासात अतिशय हुशार होती. तिने चांगल्या पध्दतीने अभ्यास करून व चांगले गुण संपादन करून बी.जे. मेडिकलला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. परंतु, तिच्या कॉलेजच्या परीक्षेचा अभ्यास न झाल्याने तिला काही प्रमाणात नैराश्य आले होते. तिने वडिलांना याची कल्पनादेखील दिली होती.

बुधवारी सकाळी तिचे वडील तिला नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजमध्ये सोडून गेले. परंतु, अभ्यास न झाल्याने तिने ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिला तातडीने उपचाराकरीता दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आदितीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com