टिकटॉकसाठी स्टंटबाजी करणे पडले महागात; एका महिलेचा मृत्यू

टिकटॉकसाठी स्टंटबाजी करणे पडले महागात; एका महिलेचा मृत्यू

पुण्यातील मंमदवाडी परिसरातील घटना

चंदशेखर भांगे | पुणे : मोबाईल आल्यापासून सोशल मीडियाचे चांगलेच पेव फुटले असून अनेकदा जीवावर बेतत आहेत. अशीच एक घटना पुण्यातून समोर येत आहे. टिकटॉक व्हिडीओ बनविण्याच्या नादात एक महिलेचा मृत्यू झाला आहे. तसलीम फिरोज पठाण असे या महिलेचे नाव आहे. तर, शहानुर शेख आणि जाइद जावेद शेख अशी टिकटॉक स्टारची नावे आहेत.

टिकटॉकसाठी स्टंटबाजी करणे पडले महागात; एका महिलेचा मृत्यू
फडणवीसांच्या मनात आले तर...; जयंत पाटलांचा चिमटा

आयन आणि जाइद हे दोघे काल रात्रीच्या सुमारास मंमदवाडीमधील कृष्णा नगर येथील पालखी रस्त्यावर दुचाकीवरुन स्टंटबाजी करत होते. आयान याने जाइदला चिथावणी दिल्यानंतर त्याने तसलीम पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर दोघेही आरोपी पळून गेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com