Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच...

उद्धव ठाकरेंनी केली घोषणा
Published by :

बृहन्मुंबई महानगरपालिकेने मान्यता दिली किंवा नाही दिली तरीही पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा येथील शिवाजी पार्क मैदानावर घेणार असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी मंगळवारी सांगितले. मुंबईचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने रॅलीच्या परवानगीसाठी केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी बीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

आम्हाला परवानगी मिळो किंवा न मिळो बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेना कार्यकर्ते शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी जमतीलच. प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी किंवा नाकारावी. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्हाला उत्तर नाही मिळाले तरी दसरा मेळाव्यासाठी बाळासाहेबांचे शिवसेना कार्यकर्ते शिवाजी पार्कवर जमतील असं वैद्य म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Maharashtra CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाने मध्य मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मागितली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Live Update: शिवसेना म्हणजे रस्त्यावरचा ढेकूण नाही, कोणीही येईल आणि चिरडून जाईल

शिवसेना स्थापनेपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आहे. यावर बीएमसीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दोन्ही गटांनी पर्यायी म्हणून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या एमएमआरडीए मैदानावर रॅली घेण्याच्या परवानगीसाठी अर्जही केला आहे. गेल्या आठवड्यात बीकेसी येथे शिंदे कॅम्पला मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी द्यावी आणि परवानगी न मिळाल्यास कायद्याचा आधार घ्यावा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले.

शिंदे कॅम्पसाठी बीकेसी मैदान उपलब्ध करून दिल्यास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी द्यावी असं देखील पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com