रजनीकांतसोबत काम करण्याची संधी देण्याचे सांगून अभिनेत्रीची फसवणूक

रजनीकांतसोबत काम करण्याची संधी देण्याचे सांगून अभिनेत्रीची फसवणूक

दोघांविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

साऊथ सुपर स्टार रजनीकांतसोबत जेलर आणि पुष्पा - 2 या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका देण्याचे सांगून अंधेरी येथील नवोदित अभिनेत्रीची तब्बल साडेआठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पियुष जैन आणि समीर अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे असून अभिनेत्रीची आईने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पात्र निवडणारे आणि बोगस दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

रजनीकांतसोबत काम करण्याची संधी देण्याचे सांगून अभिनेत्रीची फसवणूक
मनसेचा एक आमदार गेल्याने चिन्ह गेले का? अंबादास दानवे

इंस्टाग्रामवर आरोपी आणि पीडित यांची ओळख झाली होती. आरोपींनी पीडितेच्या इंस्टाग्रामवर एक फ्रेश चेहरा नवीन चित्रपटासाठी शोधत आहोत, असा मेसेज पाठवला असता पीडितेने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर तिला पोलिसांच्या वेशातील एक फोटो व्हॉट्सअपवर मागवून घेतला. आरोपींनी रजनीकांत आणि पीडीतेचे चित्रपटाचे एक पोस्टर तयार करून पीडितेला व्हॉट्सअप वर पाठवले.

पियुष नावाच्या व्यक्तीने पासपोर्ट आणि फ्रान्समध्ये शूटिंग होणार आहे, असे सांगून व्हिजा गरजेचा आहे आणि त्याकरता साडेआठ लाख रुपये ऑनलाईन मागवून घेतले. मात्र नंतर ना व्हिजा आला ना चित्रपटाच्या शूटिंगसाठी फ्रान्सला नेण्यात आलं. फसवणूक झाल्याचे समजताच अभिनेत्रीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन या दोघांविरोधात तक्रार दिली आहे. सध्या दोन्हीही आरोपी फरार असून वर्सोवा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com