अखेर प्रसिद्ध युट्यूबर बिंदास्त काव्या मध्यप्रदेशमध्ये सापडली

अखेर प्रसिद्ध युट्यूबर बिंदास्त काव्या मध्यप्रदेशमध्ये सापडली

काव्याच्या आई-वडिलांनी सुटकेचा सोडला निश्वास

औरंगाबाद : प्रसिध्द युट्युबर 16 वर्षीय बिंदास्त काव्या अखेर सापडली आहे. मध्यप्रदेशमधील इटारसीमध्ये काव्या सापडली आहे. दोन दिवसांपासून ती बेपत्ता होती. यामुळे तिच्या आई-वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बिंदास्त काव्या शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाली होती. यामुळे सर्वत्रच एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी कुटुबियांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. परंतु, पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला होता. परंतु, अखेर काव्या मध्यप्रदेशमध्ये सापडली आहे. मध्यप्रदेशमधील इटारसीमध्ये ती सापडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी अभ्यासाच्या कारणावरून काव्याचे आणि तिच्या आई-वडिलांचे भांडण झाले होते. आई-वडिलांनी तिचा मोबाईल घेतल्याने ती रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यानुसार काव्या ही रेल्वेने बाहेरगावी गेली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता.

प्रसिध्द युट्युबर बिंदास्त काव्या कमी वयात काव्याने युट्युबवर यशस्वी भरारी घेतली आहे. तिचे यूट्युबवर 4.32 मिलियन सबक्राबर आहेत. काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिध्द केला होता. ती कधीही एकटी राहत नाही. कुठेही दिसल्यास आम्हाला कळवा, असे आवाहन त्यांनी व्हिडीओद्वारे केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com