Akola Crime
Akola CrimeTeam Lokshahi

आयफोन मागितल्याने रागाच्या भरात वडिलांनीच केली पोटच्या मुलाची हत्या

कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत ही घटना घडली.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर : येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयफोन मागितल्याने रागाच्या भरात वडिलांसह भावानेच तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. अमरसिंह थोरात असं खून झालेला तरुणाचं नाव आहे. कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. वडील दत्ताजीराव थोरात व भाऊ अभिजित थोरात अशी आरोपींची नावे आहेत.

Akola Crime
तुमच्या धर्माने शिवरायांचा राज्याभिषेक का नाकारला? भागवतांच्या 'त्या' विधानावर आव्हाडांचा पलटवार

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावचे थोरात रहिवासी आहेत. अमरसिंह थोरात दहा वर्षांपासून पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करत होता. त्यानंतर घरातूनच त्याचा अभ्यास सुरू होता. मात्र यश न आल्याने कोल्हापुरात अमरसिंहने वकिलीचं शिक्षण सुरू केले होते. सातत्याने अपयश आल्याने अमरसिंह दारुच्या आहारी गेला होता. यामुळे घरात वारंवार भांडणं होत होती.

तर अमरसिंहने आयफोन घेण्यासाठी वडिलांकडे दीड लाखांची मागणी केली होती. परंतु, नकार दिल्याने अमरसिंहचे वडिलांसोबत मोठा वाद झाला. याच रागातून वडिलानी घरात अमरसिंहच्या डोक्यात लोखंडी पाईप घातला. प्रचंड रक्तस्राव झाल्याने अमरसिंहचा मृत्यू झाला. यामुळे वडिलांनी घाबरून मृतदेह रस्त्याशेजारी टाकला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना तपासाची चक्रे फिरवत 24 तासात छडा लावला. व दोन्हीही आरोपींना अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com