राज्यातील पहिली तृतीयपंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 जणांनी दिली मैदानी परीक्षा

राज्यातील पहिली तृतीयपंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 जणांनी दिली मैदानी परीक्षा

महाराष्ट्र राज्यात प्रथमच तृतीयपंथींना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे.

प्रशांत जगताप | सातारा : महाराष्ट्र राज्यात प्रथमच तृतीयपंथींना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी अर्ज केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली पोलीस भरती पार पडली असून यामध्ये आर्या पुजारी, भूषण शिंदे आणि सतीश पाटील या तृतीयपंथीयांनी पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज केला होता.

राज्यातील पहिली तृतीयपंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 जणांनी दिली मैदानी परीक्षा
माझ्या कुटुंबास अडकवण्याचा प्रयत्न; अमृता फडणवीसांवर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

राजभरातून एकूण 73 तृतीयपंथीय उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केला आहे. साताऱ्याच्या आर्या पुजारी यांनी पोलीस होण्याची इच्छा व्यक्त करत सराव सुरू केला होता. आर्यांची पहिली बातमी LOKशाहीने प्रसारित केल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागी झाले होते.

साताऱ्याच्या आर्या पुजारी यांनी पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांसाठी जागा उपलब्ध करावी यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्याला यश मिळाले असून आज राज्यातील तृतीयपंथीयांची पहिली भरती ही साताऱ्यात होत आहे.

तीन जणांच्या भरतीसाठी 70हुन अधिक पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. 100 मीटर, 800 मीटर आणि गोळा फेक अशी मैदानी चाचणी घेण्यात आली. मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा होणार असून यामध्ये पात्र झाल्यास राज्यातील पहिली तृतीयपंथी पोलीस होण्याचा मान आर्या पुजारीला मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com