Crime
CrimeTeam Lokshahi

धक्कादायक! रागाच्या भरात वाईन शॉप मालकाने ग्राहकाच्या डोक्यात फोडली दारूची बाटली

दारु दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील वाद नवे नाहीत.

अनिल ठाकरे | चंद्रपूर : दारु दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील वाद नवे नाहीत. मात्र, दारू दुकानदाराचा संताप अनावर होऊन त्याने चक्क ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून ग्राहकाला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जटपुरा गेट जवळीक आनंद वाईन शॉप येथे घडली आहे. दुकानाचे संचालक संदिप अडवाणी ह्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Crime
राज्यपालांचे 'तो' निर्णय ठाकरे सरकार पाडण्याचं पाऊल; सुप्रीम कोर्टाचे कोश्यारींच्या भूमिकेवर ताशेरे

शहरातील जटपुरालगत असलेल्या आनंद वाईन शॉपचे मालक चंद्रकांत अडवाणी यांचा मुलगा संदीप अडवाणी याने क्षुल्लक वादातून एका ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. त्यात तरुण ग्राहक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या ग्राहकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी संदीप अडवाणी याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.

शहरातील अत्यंत गजबजलेल्या मार्गालगत हे दारूचे दुकान असून मद्यापींची येथे कायम गर्दी असते. जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर जटपुरा गेटलगत चंद्रकांत अडवाणी या दारू व्यावसायिकाने आनंद वाईन शॉप सुरू केले. या वाईन शॉपमुळे रस्त्यावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सायंकाळी या मार्गावरून महिलांना ये-जा करताना मन:स्ताप सहन करावा लागतो. मंगळवारी रात्री एक ग्राहक वाईन शॉपमध्ये गेला असता क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. वाद विकोपाला गेला काउंटरवर बसून असलेला चंद्रकांत अडवाणीचा मुलगा संदीपने ग्राहकाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. त्यामुळे तरूण रक्तबंबाळ झाला. या मारहाण प्रकरणी तरुणाच्या तक्रारीनंतर संदीप अडवाणीला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com