पार्सल देण्यासाठी आलेल्या zomato डिलिव्हरी बॉयने घेतले तरुणीचे जबरदस्ती चुंबन

पार्सल देण्यासाठी आलेल्या zomato डिलिव्हरी बॉयने घेतले तरुणीचे जबरदस्ती चुंबन

पुण्यातील धक्कादायक घटना

अमोल धर्माधिकारी | पुणे : पार्सल देण्यासाठी आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयने 19 वर्षीय तरुणीचे जबरदस्ती चुंबन घेतले. याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील येवलेवडी येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पार्सल देण्यासाठी आलेला डिलिव्हरी बॉयने पाणी मागितले असता तरुणीने पाणी आणून दिले. यानंतर डिलिव्हरी बॉयने थँक्यू म्हणण्याच्या बहाण्याने चक्क तरुणीचे जबरदस्ती चुंबन घेऊन विनयभंग केल्याची घटना घडली. तरुणीने घडलेल्या प्रकाराची कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तरुणीच्या तक्रारीनुसार कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी डिलिव्हरी बॉय याला शोधून काढले असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव रईस शेख असल्याचे समजत आहे.

Lokshahi
www.lokshahi.com