“जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत” – निलेश राणे

“जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत” – निलेश राणे

Published by :

लोकशाही न्यूज नेटवर्क | सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत. यातच धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्कारासारखा गंभीर आरोप लावला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत सापडले आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर होणाऱ्या या आरोपामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर चांगलाच निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत नरेंद्र मोदी यांच्यामुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्सच्या प्रकरणात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललंय काय? इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत अशी खरमरीत टीका केली आहे.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1349717579519049728?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1349717579519049728%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fpolitics%2Fnilesh-rane-target-ncp-sharad-pawar-over-dhananjay-munde-nawab-malik-allegation-a629

यासोबतच शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांच्या भेटीवरुन देखील मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या प्रकरणासाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? असा सवाल उपस्थित करत हे प्रकरण झाकायचा अजेंडा दिसतोय, यामुळे पोलिसांवर लोकांचा विश्वास उडेल, सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का? हे पण आयुक्तांनी सांगावं अशी टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com