वर्ध्यात गणपती विसर्जनात विघ्न, विसर्जनाला गेलेले तीन जणांचा बुडून मृत्यू

वर्ध्यात गणपती विसर्जनात विघ्न, विसर्जनाला गेलेले तीन जणांचा बुडून मृत्यू

सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली घटना
Published by :
Sagar Pradhan

भूपेश बारंगे। वर्धा: वर्ध्यातील मांडवा येथे गणपती विसर्जनाला गेलेल्या इसमासह दोन बालके बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटना आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली.या हृदयद्रावक घटनेने गावात शोककळा पसरली.

वर्ध्यात गणपती विसर्जनात विघ्न, विसर्जनाला गेलेले तीन जणांचा बुडून मृत्यू
तुम्ही बॉडी दिली तर आधी तुम्ही माफी मागा, कबरीच्या मुद्यावरून जाधवांची भाजपवर टीका

मृतक संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (वय35),कार्तिक तुळशीराम बलविर (वय 11 ),अर्थव सचिन वंजारी (वय 10) यांचा गणपती विसर्जन करताना मांडवा गावशेजारील मोती नाल्यात बुडून मृत्यू झाला. राज्यात अनंत चथुर्थी दिवसाला सर्वत्र गणपतीचे विसर्जन सुरू आहे. वर्ध्यातही गावागावात गणपतिचे विसर्जन केले जात आहे.यातच मांडवा गावात हृदयद्रावक घटना घडली. येथील गावशेजारील मोती नाल्याच्या बंधाऱ्यात आज गावातील संदीप चव्हाण यांच्या सोबत पाच ते सहा जण गणपती विसर्जन करायला गेले होते. यावेळी दोन बालक हे जात असताना पाण्याच्या धारेत वाहून जाताच खड्यात पडले त्यांना वाचवण्यासाठी संदीप चव्हाण उतरले असता दोन्ही बालके त्यांना चिपकले असता तिघांनाही पोहता येत नसल्याने बुडाले.

वर्ध्यात गणपती विसर्जनात विघ्न, विसर्जनाला गेलेले तीन जणांचा बुडून मृत्यू
वर्दीतील माणुसकी, कचराकुंडीत सापडलेल्या नवजात मुलीचे बोरिवली पोलीस करणार संगोपन

येथे उपस्थित मुलींनी गावात धाव घेत आरडाओरडा करत नागरिकांना तिघे जण बुडाले असल्याची माहिती देताच नागरिकांनी धाव घेत तिघांना बाहेर काढले असता दोघे बालक जागीच मृत्यू झाला तर संदीप चव्हाण यांना धुकुधुकी असल्याने तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला.या घटनेत कार्तिक तुळशीराम बलवीर (वय 12 ) व अर्थव सचिन वंजारी (वय 14) रा.मांडावा यांचा जागीच मृत्यू झाला. याचे मृतदेह शवविच्छेदन नेण्यात आले आहे.तिघांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनास्थळी सावंगी पोलिस पोहचले असून ठाणेदार धनाजी झळक यांनी माहिती दिली.

गणपती विसर्जन जीवावर बेतले

मांडवा येथे गावालगत असलेल्या नदीवरील बंधाऱ्यात गणपती विसर्जनाला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.गणपती विसर्जन तिघांच्या जीवावर बेतल्याने, गणपती विसर्जन करताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.आज घडलेल्या घटनेने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे असे माहिती ठाणेदार धनाजी झळक यांनी लोकशाहीला दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com