Video : कीर्तनासाठी होत होता उशिर; महाराजांना घ्यायला पाठविले हेलिकॉप्टर

Video : कीर्तनासाठी होत होता उशिर; महाराजांना घ्यायला पाठविले हेलिकॉप्टर

कीर्तनासाठी वेळ होत असल्याने चक्क महाराजांसाठी हेलिकॉप्टरची सोय

संजय देसाई | सांगली : सांगली ते पुणे येथे कीर्तनासाठी दोन तासांच्या आत येणे अशक्य असल्याचे पाहून आयोजकांनी एक अनोखी युक्ती लढवली. कीर्तनकार महाराजांना सांगलीतून थेट एअरलिफ्ट करण्यात आले. व महाराजांना ५५ मिनिटांत हेलिकॉप्टरने पुण्यात आणले. हे वृत्त आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

Video : कीर्तनासाठी होत होता उशिर; महाराजांना घ्यायला पाठविले हेलिकॉप्टर
'स्वत:चा धर्म सोडा आणि येशूची पूजा करा'; आळंदीमध्ये काही जणांकडून धर्म परिवर्तनाचा प्रयत्न

केज तालुक्यातील रामकथाकार, कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा सुरू आहे. त्यांना पुण्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात काल कीर्तनाचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, सांगली ते वाघोली हे अंतर पाच तास १७ मिनिटांचे होते आणि शर्मा महाराज यांची गुरुवारची रामकथा सायंकाळी पाच वाजता संपणार होती. दोन तासांत महाराजांना कारने वाघोली येथे पोहोचणे आवश्यक होते.

कारने हा प्रवास करण्यासाठी महाराजांना पाच तास लागणार होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराजांच्या कीर्तनासाठी आयोजक शांताराम खटके व भाविकांनी त्यांच्यासाठी थेट सांगली ते वाघोली अशी महालक्ष्मी कंपनीच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यामुळे समाधान महाराज शर्मा हे केवळ ५५ मिनिटांत वाघोली येथे कीर्तनासाठी सायंकाळी पोहचले. हे पाहून भाविकांना सुखद धक्का बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com