Ganesh Visarjan 2022 Live : प्रभादेवी येथे शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Ganesh Visarjan 2022 Live : प्रभादेवी येथे शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

सर्वत्र विसर्जन मिरवणुकीची धूम

प्रभादेवी येथे शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने

मुंबईत सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मिरवणूका ह्या शांततेत होत असताना प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते हे समोरा- समोर आले होते. संजय भगत आणि समाधान सरवणकर यांचे कार्यकर्ते हे समोरासमोर आले होते. समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव..म्याव अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावरुन वातावरण तापले होते. त्यानंतर मात्र, दोन्ही गटात घोषणाबाजी झाली.त्यामुळे या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या झोनचे डीसीपी या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

विसर्जन करताना पनवेलमध्ये 11 जणांना वीजेचा शॉक

राज्यात भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. अशातच गणेश विसर्जनाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. विसर्जना दरम्यान 11 जणांना विजेचा शॉक लागला आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले.

अमदनगरमध्ये शिंदे गटात आणि  शिवसेनेत तणाव 

अहमदनगर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला. शिवसेना गटाच्या पुढे डीजे घेतल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

राजाची राजेशाही विसर्जन

लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणूक भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालया समोर आली आहे. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन गाड्यांचे सायरन वाजवून लालबागच्या राजाला सलामी देण्यात आली आहे.

पुण्यातील पाचव्या मानाच्या बाप्पाचे विसर्जन

पुण्यातील पाचव्या मानाच्या केसरीवाडा गणपतीचं विसर्जन झालं आहे. या वेळी गणेश भक्तांची अलोट गर्दी जमली होती. गणेश भक्तांनी आरती करून लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

१,२,३ चार पहा मुंबईच्या राजाचा थाट

राज्यात पावसात गणरायाला आज नागरिक ठिकठिकाणी निरोप देत आहे. मुंबईतही प्रचंड पावसात गणरायांना निरोप देत आहेत. अशातच मुंबईच्या राजाला नागरिकांनी पावसाची चिंता न करता निरोप दिला. उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. सर्वत्र ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेश भक्त एकवटले आहे.

भर पावसात नाशिकरांचा लाडक्या बाप्पाला निरोप  

राज्यात पावसात गणरायाला आज नागरिक ठिकठिकाणी निरोप देत आहे. नाशिकमध्ये उत्साहाच्या वातावरणात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली आहे. सर्वत्र ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी अख्ख नाशिक एकवटल आहे. आत्तापर्यंत नाशिकच्या मिरवणुकीत 11 मंडळ ही विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. दरम्यान बाप्पांना निरोप देण्यासाठी पावसात देखील हजेरी लावल्याचे दिसून आले.

कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या बाप्पाचं विसर्जन 

राज्यात आज सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला जात आहे. त्यातच आता कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या बाप्पाचे वि्सर्जन करण्यात आले. मुंबईतील गिरगाव येथे गणरायांचे विसर्जन करण्यात आले आहे.

मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन

पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन झाले आहे. मोठ्या दिमाखात ढोल-ताशांच्या गजरात गणपतीची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी राजकीय नेत्यांसह मराठी तारकांनीही विसर्जन मिरवणुकीस हजेरी लावली होती.

अंबादास दानवे यांनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद

संपूर्ण राज्यात आज मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडत आहे. अशातच राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजवण्याचा आनंद लुटला आहे. औरंगाबादमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरवात झाली आहे. यावेळी अनेक राजकीय नेत्यांची या मिरवणुकीत सहभाग आहे.

Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022Team Lokshahi

लालबाग परळमधील गणेशोत्सवाची भव्यता व सुंदरता वाढवण्याचे काम येथील पुष्पवृष्टी मंडळं करत आहेत. गेल्या ३७ वर्षांपासून शेकडो गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टीद्वारे गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणं फेडण्याचं काम सेवा साधना पुष्पवृष्टी मंडळ करत आहेत. यंदाही मंडळानं पुष्पवृष्टीसाठी मस्तगंधा रुपातील श्री विष्णूंची प्रतिकृती साकारली आहे.

लालबागचा राजा मार्गस्थ 

मुंबईतील प्रसिध्द गणपती लालबागचा राजा मार्गस्थ विसर्जनासाठी झाला आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली असून गुलालाची उधळण करण्यात येत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी एकच गर्दी झाली आहे.

नागपूरच्या राजाची मिरवणूक निघाली

नागपूरचा राजाची विधिवत पूजा करून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. त्यापूर्वी पथकाच्या तालावरती आरती करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषमध्ये नागपूरच्या राजाला बाहेर काढून विसर्जनासाठी नेण्यात आले. नागपूरच्या राजाचा विसर्जनाचा रथ संपूर्ण फुलाने सजवण्यात आला आहे.

मराठी तारकांचे पुण्यात ढोलवादन

पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती निघालेल्या मिरवणुकीत कलावंत ढोल ताशा पथकासह सहभागी झाले आहेत. मराठीत नामांकीत कलावंत ढोल आणि ताशावर आपली कला सादर करत आहेत.

पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मतभेद विसरुन आदित्य ठाकरे आणि चंद्रकात पाटील एकत्र

पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजप नेते चंद्रकात पाटील, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. कसबा गणपतीची आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी आदित्य ठाकरे आणि चंद्रकात पाटील यांनी पालखीला एकत्रित खांदा दिला.

अजित पवारांनी घेतले पुण्यातील गणपतींचे दर्शन; मंडळांना केले 'हे' आवाहन

पुणे : गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत आपल्या लाडक्या बाप्पांना आज भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसोबत मंडळांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार आज पुण्यात असून मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले आहे. यावेळी ते बोलते होते.

Ganesh Visarjan 2022 Live : प्रभादेवी येथे शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
अजित पवारांनी घेतले पुण्यातील गणपतींचे दर्शन; मंडळांना केले 'हे' आवाहन

मुंबईच्या राजाचा विसर्जन मिरवणूक सोहळा सुरु

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. मुंबईच्या राजाचे विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. गुलालाची उधळण करुन बाप्पाची मिरवणूक निघाली आहे. जल्लोषाचे वातावरण, फटाक्यांती आतषबाजी होत आहे.

Ganesh Visarjan 2022 Live : प्रभादेवी येथे शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
मुंबईच्या राजाचा विसर्जन मिरवणूक सोहळा सुरु

गणेश विसर्जनासाठी वाहतूक पोलीस सज्ज

कोरोनाच्या दोन वर्षानंतर आज अनंत चतुदर्शीची धामधूम आहे. अशात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांसह सुमारे 10 हजार पोलिसांचा ताफा सज्ज झाला आहे.

Ganesh Visarjan 2022 Live : प्रभादेवी येथे शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज, असा असणार बंदोबस्त

विसर्जन मिरवणुकीची धूम; मुंबईत वाहतुकीसाठी 31 रस्ते बंद

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दोन वर्षानंतर उद्या मोठ्या जल्लोषात गणपती उत्सव पार पडला जात आहे. अशातच यंदा मोठ्या संख्येने गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी महत्त्वाच्या विसर्जन स्थळी पाहायला मिळेल. त्यामुळे होणाऱ्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवाय या गर्दीवर करडी नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी 31 रस्ते बंद करण्यात आले आहे. 29 मार्गांवरून एकेरी वाहतूक तर 21 मार्गांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत.

Ganesh Visarjan 2022 Live : प्रभादेवी येथे शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
विसर्जन मिरवणुकीची धूम; मुंबईत वाहतुकीसाठी 31 रस्ते बंद

पुढच्या वर्षी लवकर या! आज अनंत चतुर्दशी, लाडक्या बाप्पाला निरोप

गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या असे आपल्या लाडक्या बाप्पाकडून वचन घेत गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे. दोन वर्ष कोरोनाच्या सावटानंतर यंदा गणोशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. पहिल्या दिवसांपसून लोकांचा उत्साह पाहायला मिळत होता. आपल्या भक्तांकडून मनोभावे सेवा करुन घेतल्यानंतर आज पाहुण्या आलेल्या बाप्पाला भक्त जड अंतकरणाने निरोप देत आहेत. ठिकठकाणी पारंपारीक पद्धतीने बाप्पाची मिरवणुक काढत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com