Satara
Satara Team Lokshahi

किल्ले प्रतापगडावर 15 फूट बाय 10 फुटांचा फडकला तिरंगा..

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते

सातारा | प्रशांत जगताप : साताऱ्यात किल्ले प्रतापगडावर आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन किल्ले प्रतापगडाचे मुख्य आकर्षण असलेल्या ध्वज बुरुजावर 15 फुटी बाय 10 फुटांचा भला मोठा राष्ट्रध्वज लावण्यात आलाय. किल्ले प्रतापगडला साहसी किल्ला म्हणून ओळखले जाते.. या किल्ल्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जोडला आहे. प्रतापगड हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील वीर योध्दा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. 1656 मध्ये बांधला आहे.

Satara
साताऱ्यात केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी उदयनराजेंनी दिलं शिक्षण मंत्र्यांना निवेदन

प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहादुरीचा आणि त्यांनी केलेल्या पराक्रमांचा साक्षीदार आहे. याच किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि अफझल खानमध्ये लढाई झाली होती.हा किल्ला समुद्र सपाटी पासून 1 हजार मीटर उंच बांधलाय. या किल्ल्याची उंची 3556 फुट उंच इतकी आहे.1656 ते 1818 मधील काही महिने वगळता हा किल्ला कोणीही जिंकू शकला नाही. तर हा किल्ला शत्रू पासून अभेद्य आणि अजिंक्य राहिला. याच किल्ले प्रतापगडावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन किल्ले प्रतापगड वरील ध्वज बुरुजवर भला मोठा राष्ट्रध्वज लावण्यात आलाय.

Satara
भाजपची कितीही कुळं आली तरी शिवसेना नष्ट करू शकणार नाहीत; उद्धव ठाकरे आक्रमक

या प्रसंगी महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राजमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर चे सदस्य तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे उपस्थित होते.. पाऊसाचा प्रचंड जोर आणि वाऱ्याची कोणतीही तमा न बाळगता बुरुजावर मोठ्या ध्वज फडवण्याची ग्रामस्थांची प्रबळ इच्छा आणि महिला तहसीलदार यांची सकाळची उपस्थित यामुळे ध्वजारोहणाचे वेगळेच आकर्षक निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले आणि संकल्पना चंद्रकांत उतेकर यांची होती.

या कार्यक्रमासाठी पर्यटकांसह ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती.. या कार्यक्रमाला वनव्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विलास मोरे , आनंद उतेकर,विलास जाधव,ग्रामसेवक चिटकुळ बबन कासुर्डे, सर्कल खटावकर उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com