Tukaram Mundhe
Tukaram MundheTeam Lokshahi

तुकाराम मुंढेंची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची नागपूरच्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळामध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती
Published by :
Sagar Pradhan

सर्वात प्रचलित अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली होती. त्यांच्याकडे कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जवाबदारी होती. मात्र, आता तुकाराम मुंढे यांची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची नागपूरच्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळामध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe
राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का? राज ठाकरेंचा सवाल

शिंदे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले होते.

तुकाराम मुंढेंच्या 16 वर्षात 19 वेळा बदली

ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर

सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग

जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर

मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग

जुलै 2009 - सीईओ, वाशिम

जून 2010 - सीईओ, कल्याण

जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना

सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई

नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी

मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका

मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे

फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका

नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन

डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई

जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका

ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत

सप्टेंबर - 2022 - आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com