महाराष्ट्र
रत्नागिरीत दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक; 25 प्रवासी जखमी
अपघातातील जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
रत्नागिरी : येथील दापोलीत दोन बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून बसचालकही गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये शाळकरी मुलांचाही समावेश आहे.
बोरवली-दापोली बस दापोलीकडे येत असताना दापोलीकडून मुरतपूरकडे जाणाऱ्या बस मौजे दापोली वळणावर समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. दोन्ही बस समोरासमोर धडकल्यामुळे बसचे स्टेरिंग लॉक झाले. बोरवली-दापोली बसमधील चालक गंभीर जखमी झाला आहे. यासोबत सुमारे 25 प्रवासी जखमी असून यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी तातडीने जखमींना बाहेर काढले. दरम्यान, जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.