आपापसतील वादातून शिंदे गटातील 2 गट भिडले; तोडफोडीचा प्रयत्न

आपापसतील वादातून शिंदे गटातील 2 गट भिडले; तोडफोडीचा प्रयत्न

वर्तक नगर प्रभाग समिती समोर डंपरची तोडफोड करण्याचा प्रयत्न

ठाणे : आपापसतील वादातून शिंदे गटाचे दोन गट आपापसात भिडले आहेत. ठाण्यातील वर्तक नगर प्रभाग समिती समोर ही घटना घडली असून डंपरची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांचा गट आणि माजी गटनेते दिलीप बारटक्केंचा गट आपापसात भिडल्याचे समजत आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.

आपापसतील वादातून शिंदे गटातील 2 गट भिडले; तोडफोडीचा प्रयत्न
समीर वानखेडे आणि शाहरुख खानमधील व्हॉटस अ‍ॅप चॅट समोर

ठाण्यातील वर्तक नगर परिसरात सुरू असणाऱ्या बांधकाम साईट वरून शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक गट आणि माजी गटनेते दिलीप बारटक्के गट पुन्हा एकदा आपापसात भिडले आहेत. वर्तक नगर प्रभाग समिती समोरील बिर्ला कम्पनी येथील बांधकाम कंत्राट वरून या दोन्ही गटांमध्ये अनेक महिन्यापासून वाद सुरू आहेत. आज या बांधकाम साईटवरून काही डंपर जात असतांना सरनाईक गटाच्या काही जणांनी ते अडवले आणि डंपरची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.

यात डंपरच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. यावेळी मोठा जमाव जमून काही काळ वातावरण तंग निर्माण झाले होते. मात्र, तात्काळ पोलिसांनी दोन्ही गटाला पांगवले असून सध्या त्या ठिकाणी दोन्ही बाजूने कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहे. दरम्यान, याप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः मध्यस्थी करून हा वाद मिटवावा अशी मागणी करण्यात येतेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com