महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या प्रदेशाध्यपदी उमाकांत अग्निहोत्री

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या प्रदेशाध्यपदी उमाकांत अग्निहोत्री

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उत्तर भारतीय सेलची स्थापना करून उमाकांत अग्निहोत्री यांची त्या सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अग्निहोत्री यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी माजी मंत्री अनिस अहमद, आमदार विकास ठाकरे, आमदार शिशिर नाईक, अतुल कोटेचा, राजा तिडके, बाबूलाल विश्वकर्मा, उमेश डांगे यांच्यासह अनेक उत्तर भारतीय पदाधिकारी उपस्थित होते.

Umakant Agnihotri

उमाकांत अग्निहोत्री हे नागपूरचे असून उत्तर भारतीय सभेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. हिंदी भाषिक लोकांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे तसेच हिंदी भाषक लोक व पक्षातील नेतृत्वाशीही त्यांचा चांगला संपर्क आहे. उत्तर भारतीय लोकांना काँग्रेस पक्षाशी जोडून पक्ष संघटन मजबूत करण्यावर आपला भर असेल. काँग्रेसची विचारधारा ही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. हीच विचारधारा देशाला तारणारी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करू, असे अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com