राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट पुन्हा एकदा आले आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट पुन्हा एकदा आले आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. पुणे, अमरावती, कोल्हापूर, चंद्रपूर, सातारा आणि नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
H3N2 Flue : नागरिकांनी अंगावर काढू नये; आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

अमरावती येथे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. सध्या गहू, हरभरा, काढणीवर आहे. यात पावसाने हजेरी लावल्याने पीक खराब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात हरभरा व गहू सोगणी करून ठेवला आहे. तर, पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अचानक झालेल्या पावसाने मात्र शेतकरी पुन्हा एकदा संकटात आला आहे.

कोल्हापूरला जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. गारगोटीत अर्धा तास गारांसह वादळी पाऊस बरसला आहे. यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. कोल्हापूरात जिल्ह्यात 17 मार्चपर्यंत वादळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज सांगितला आहे.

तर, सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. वाई, पाचगणी, खंडाळा, भुईंज परिसरात ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस सुरुवात झाली आहे. पावसामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १५ आणि १६ मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com