योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर; बॉलिवूड दिग्गजांची भेट घेणार

योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर; बॉलिवूड दिग्गजांची भेट घेणार

योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कालच चंद्रपुरातून भाजपच्या मिशन 145 ला सुरुवात केली. यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर; बॉलिवूड दिग्गजांची भेट घेणार
मुंबईत अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मुंबई दौऱ्यावर येणार असून उद्योगपती आणि बॉलिवूड जगतातील दिग्गज व्यक्तींची भेट घेणार आहेत. तर, 5 जानेवारीला सिद्धिविनायक व महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी 2020 मध्ये नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. यासाठी योगींनी फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल, असं योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं होते. यावर महाराष्ट्रातून जोरदाक टीका करण्यात आली होती. अशातच, योगी आदित्यनाथ यांनी ठाकरे सरकारच्या काळात दौरा केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com