मुंबईत अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन
Admin

मुंबईत अंगणवाडी सेविकांचे ठिय्या आंदोलन

अंगणवाडी सेविकांचे आज आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन होणार आहे. सावित्रीबाईंचा मुखवटा घालून धरणे आंदोलन केलं जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अंगणवाडी सेविकांचे आज आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन होणार आहे. सावित्रीबाईंचा मुखवटा घालून धरणे आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा मुखवटा धारण करून मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत धरणे आंदोलन केले जाणार आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोबईल बंद व नादुरुस्त आहेत तरीदेखील त्यांना वैयक्तिक मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर भरण्याची सक्ती व जबरदस्ती केली जात आहे. या दडपशाहीमुळे अंगणवाडी कर्मचारी संतप्त झाले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांचा आग्रह धरण्यासाठी ३ जानेवारीला आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युईटी द्या, मानधनात भरीव स्वरूपाची वाढ, सेवानिवृत्तांना एकरकमी सेवासमाप्ती लाभ, कार्यक्षम मोबाईल, राजभाषेत पोषण ट्रॅकर अॅप, अंगणवाडी केंद्रांच्या भाड्यामध्ये वाढ, लाभार्थ्यांच्या पोषण आहाराच्या दरात दुपटीने वाढ आदी अनेक प्रश्नांसाठी अंगणवाडी कर्मचारी सतत संघर्ष करत आहेत. मानधनात वाढ करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप अंमलबजावणी झाली नाही, अशी तक्रार करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com