”जन’तेचा ‘आशीर्वाद’ दहा वर्षांपुर्वीच गमावला’; वैभव नाईकांची राणेंवर जळजळीत टीका

”जन’तेचा ‘आशीर्वाद’ दहा वर्षांपुर्वीच गमावला’; वैभव नाईकांची राणेंवर जळजळीत टीका

Published by :

समीर महाडेश्वर | केंद्रीय मंञी नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा फक्त शिवसेनेनेवर टीका करण्यासाठी आहे का असा सवाल करत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी अशा बाडग्यांना शिवसेनेनेवर आरोप करण्यासाठी ही जनआर्शिवाद याञा असल्याचा जळजळीत आरोप केला.

वैभव नाईक पुढे म्हणाले, महाराष्ट्रात, कोकणात मोठ्या प्रमाणात पुर आला लोकांच मोठ नुकसान झालं. यावेळी राणेंनी मला पंतप्रधानांनी पाठवलय म्हणून सांगीतलं आणि पूरग्रस्ताना मदत करू म्हणाले, माञ विमानतळावर उतरल्यापासून राणे शिवसेनेनेवर टीका करत आहेत.

राणेंनी मदत करू म्हणाले, माञ गेल्या दिड महीन्यात राणेंनी पूरग्रस्ताना दमडी सुद्धा दिली नाही कोकणात एखादा नवीन प्रकल्प किंवा एखादी नवीन योजना आणण्याची घोषणा तरी केली का? फक्त शिवसेनेनेवर टीका करण्यासाठीचं ही याञा आहे का? असाही सवाल उपस्थित केला. तसेच याञेला लोकांचा आशीर्वाद मिळणार नसून लोकांचा आशीर्वाद यांनी दहा वर्षांपुर्वीच गमावला असल्याची खरमरीत टीका केली.

येथील आमदार आणि खासदार शिवसेनेनेचेचं निवडूण आलेत त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा कोकणातील जनतेचा आशिर्वाद राणेंना मिळाला नाही आणि तो मिळणार सुद्धा नाही आरोप वैभव नाईक यांनी केला.

भाजपच्या काही लोकांना अजूनही शिवसेनेने आणि भाजप एकञ राहू शकतो म्हणून भाजपचे नेते शिवसेनेनेवर आरोप करीत नाहीत माञ अशा बाडग्यांना शिवसेनेनेवर आरोप करण्यासाठी ही जनआशीर्वाद याञा असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com