सूर्य आग ओकणार! राज्याला हवामान खात्याचा महत्वाचा इशारा

सूर्य आग ओकणार! राज्याला हवामान खात्याचा महत्वाचा इशारा

राज्यभरात अवकाळी पावसाने दाणादाण उडवल्यानंतर सूर्य सध्या आग ओकताना पाहायला मिळत आहे.

अमोल धर्माधिकारी | पुणे : राज्यभरात अवकाळी पावसाने दाणादाण उडवल्यानंतर सूर्य सध्या आग ओकताना पाहायला मिळत आहे. अनेक शहरांचा तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर आहे. अशातच, हवामान खात्याने राज्याला इशारा दिला आहे. राज्यात दोन दिवस उष्णता आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे महत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सूर्य आग ओकणार! राज्याला हवामान खात्याचा महत्वाचा इशारा
शरद पवारांनी भाजपाला नैतिकता शिकवायची ठरविली तर कठीणच होईल : फडणवीस

राज्यात गेल्या दोन दिवसापासून उष्णतेत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत असून काल पुणे शहरात अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा 43 अंशाच्या वर गेलेला पाहायला मिळाला. राज्यातील मराठवाडा, विदर्भ याभागात देखील उष्णतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. अशातच, पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहरासह राज्यात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे. त्यासोबत पुणे शहराचा परादेखील पुढील तीन दिवस 42 अंशाच्या वर जाईल, असं इशारादेखील पुणे वेधशाळेने दिला आहे. तर पुढील दोन दिवसानंतर उष्णतेत मोठी घट होणार असल्याची शक्यताही वेधशाळेने व्यक्त केली आहे. तर मे महिन्याचा शेवटचा आठवड्यात मान्सून येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, वाढत्या उन्हामुळे मानवासह प्राण्यांची लाही लाही होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केले आहे. तर, प्राणी-पक्षांसाठीही घराबाहेर पाणी ठेवण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com