पुढील 3 दिवस पावसाचे; उकाड्यापासून मिळणार दिलासा

पुढील 3 दिवस पावसाचे; उकाड्यापासून मिळणार दिलासा

राज्यभरात सध्या सूर्य आग ओकत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. अशातच, हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

मुंबई : राज्यभरात सध्या सूर्य आग ओकत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. अशातच, हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे या उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

पुढील 3 दिवस पावसाचे; उकाड्यापासून मिळणार दिलासा
माझी जरी भट्टी असेल तरी मला पकडा अन् टायरमध्ये घाला; अजित पवारांनी पोलिसांना सांगितले

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सोबतच विजांच्या कडकडाटासह जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज आहे. तर, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्राशिवाय येत्या काही दिवसांमध्ये भारताच्या अनेक भागात हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाने आगेकूच केल्याने येत्या तीन दिवसांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

दरम्यान, तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शेती मशागतीचे कामे वेळेत उरकून घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. तर, जून महिन्यात एक ते तीन तारखेपर्यंत पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com