kalyan
kalyan Team Lokshahi

भाजप जिल्हाउपाध्यक्षकाचा डोंबिवलीत हैदोस, राष्ट्रवादीचा आरोप

मंत्री रविंद्र चव्हाण यांचा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला पाठिंबा का? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

अमजद खान। कल्याण: भाजपच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती डोंबिवलीत हैदोस घालतोय. याला मंत्री रविंद्र चव्हाण यांचे संरक्षण आणि समर्थन आहे का? असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आणि जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी कल्याणच्या पोलिस उपायुक्तांची भेट घेतली आहे. संदीप माळी या नावाच्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी केली.

kalyan
प्रकल्प महाराष्ट्रात आणि मुलाखती चेन्नईत का ? आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ब्रह्मा माळी यांना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिम मध्ये मारहान केली होती. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांचा हल्ल्यामागे हात असल्याचा आरोप करण्यात येत होता.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. याबाबत राष्ट्रवादीने आक्रमक पवित्र घेतलाय. आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे ,राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. यावेळी संदीप माळी हा तडीपार गुंड आहे, त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, या संदीप माळीचे गुंड राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याला मारहाण करतात. त्यामुळे संदीप माळी यांना राज्याचे मंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांचं समर्थन आहे का त्यांचे संरक्षण आहे का? असा सवाल केला तसेच पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.

Lokshahi
www.lokshahi.com