संप असताना देखील भल्या पहाटे कर्मचारी बांधावर; शेतकऱ्यांकडून कौतुक

संप असताना देखील भल्या पहाटे कर्मचारी बांधावर; शेतकऱ्यांकडून कौतुक

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत

अभिराज उबाळे | पंढरपूर : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, राज्य सरकारी कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे करण्यात अडचणी निर्माण झाले आहेत. परंतु, पंढरपूरमध्ये मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी ग्रामसेवक, कृषी अधिकारी, तलाठी, सर्कल भल्या पहाटेच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. बळीराजाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची सुरुवात देखील झाली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपल्या हक्क मागण्यासाठी लढणारे कर्मचारी आपलं आंदोलन सोडून भल्या पहाटे बांधावर पोहचल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com