महाराष्ट्र
झोपडीधारकांना मिळणार स्वतःचं घर; राज्य सरकारकडून मोठी घोषणा
याबाबतची गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली
मुंबई : झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. यासंबंधीची घोषणा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या २ लाख ५० हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासन निर्णय जारी झाल्याने आता झोपडी धारकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.
राज्य सरकारने याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. यानुसार, मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चिती केली आहे. यात झोपडी असलेल्या जागांचा विकास होणार आहे. यामुळे १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळातील झोपडी धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा लाखो झोपडीवासियांना होणार आहे.