Pimpri- Chinchwad
Pimpri- ChinchwadTeam Lokshahi

पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेयसीसमोर मारहाण झाल्याने तरुणाने केली आत्महत्या

गळफास घेऊन संपवले तरुणाने जीवन
Published by :
Sagar Pradhan
Published on

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत जात आहे. असाच एका छोट्या गुन्ह्यातून तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी समोर मारहाण केल्यामुळे जिव्हारी लागून ही आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिक संतोष कुतवळ ( रा.शास्त्री चौक, भोसरी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. गळफास घेऊन प्रतिकने आपले आपले जीवन संपवले आहे.

Pimpri- Chinchwad
मुकेश अंबानींनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, दिली एवढ्या कोटींची देणगी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक आणि त्याच्या एका मैत्रिणीचे प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून मैत्रिणीसमोरच प्रतिकला मारहाण केली होती. या मारहाणीमुळे अपमानित झाल्याने त्याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी १४ सप्टेंबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी प्रतिकचे वडील संतोष जालिंदर कुतवळ ( वय ४१, रा. भोसरी ) यांनी फिर्याद दिली आहे. प्रतिकच्या वडिलांच्या फिर्यादीनंतर प्रथमेश महादू पाठारे ( वय २०, रा. पाठारे मळा, चऱ्होली ) असे नाव असणाऱ्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com