Crime
CrimeTeam Lokshahi

लव्हजिहादच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण; तरुणीने मात्र जबाबातून दिला सामाजिक संदेश

सोलापुरात टोळक्याचा धुडगूस

वसीम अत्तर | सोलापूर : शहरात एका मुस्लिम तरुणास एका टोळक्याने लव जिहादचा संशय घेत बेदम मारहाण केली आहे. ही घटना १ मार्च २०२३ रोजी सोलापुरातील एम्प्लॉयमेंट चौक परिसरात घडली. मुजाहिद पठाण असे मुस्लिम तरुणाचे नाव असून खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एका हिंदू तरुणीशी तुझे काय संबंध आहेत, तू मुस्लिम आहेस, असे म्हणत मुजाहिदला जबर मारहाण करण्यात आली आहे. जमिनीवर पाडून त्याला मारल्यामुळे छातीमधील बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे व लाथाबुक्क्यांनी तोंडावर, कानावर मारहाण केल्याने कानात रक्तस्राव होत आहे.

Crime
पोलिसांच्या आड हल्ले करु नका, समोर या; संजय राऊतांचे शिंदेंना आव्हान

याप्रकरणी पीडित तरुणीला विचारले असता तिने मुस्लिम तरुणाची बाजू घेत आमचे अनैतिक संबंध नसून, कौटुंबिक व भाऊ बहिणीसारखे संबंध असल्याची माहिती दिली आहे. तसेच, समाजात अनेक हिंदू मुलींचे मुस्लिम धर्मातील नागरिकांशी, तरुणांशी या ना त्या कारणाने, काही कामानिमित्त संपर्क येत असतो. त्याकडे लव जिहाद किंवा इतर अनैतिक संबंध आहेत या नजरेने पाहू नये, असा सामाजिक संदेश पीडित तरूणीने दिला आहे.

त्याचबरोबर माझ्यासोबत मुस्लिम तरुण बोलत बसला. या कारणाने मारहाण करणाऱ्या हिंदू संघटनांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देखील दिला असल्याची माहिती पीडित तरुणीने दिली आहे.

सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. याबाबत मारहाण करणाऱ्या व कायदा हातात घेणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com