धक्कादायक! मोबाईलवर स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

धक्कादायक! मोबाईलवर स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

हिंगोली जिल्ह्यातील धक्कादायक घटना
Published on

गजानन वाणी | हिंगोली : जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर येत आहे. कारेगाव येथील येथील 24 वर्षीय मोबईल स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे. तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नवल नाईकवाल असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आला आहे.

नवल नाईकवाल याने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचे मतदान कार्ड स्टेटसला ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अशी कॅप्शन दिली होती. यानंतर बाभळीच्या झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अपष्ट असून सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. नवल नाईकवालच्या आत्महत्येने गावात एकच खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com